
आयुष्यात काहीतरी करुन दाखवायचं. करिअरला अगदी प्राणापेक्षा महत्व द्यायचं, आणि यशाच्या शिखारापर्यंत पोहोचायचं, असं माझं स्वप्न. कहिहि झालं तरी आशा सोडायची नाहि, प्रयत्न कमी पडु द्यायचे नाहित. प्रायत्न जोरात चालु होते, पण स्वप्नपुर्ति च्या जवळपास पण मी नव्हते. मन खिन्न व्हायचं, आपल्या जवळ असलेल्या टेलेंटचं काय करायचं असे प्रश्न ऊभे रहायचे. त्यातुन लोकंच्या वेगवेगळ्या अपेक्षा आपल्याला पुर्ण करता येत नहित म्हणुन काहुरलेलं मन. किति किति म्हणुन सोसायचं, मनावर निराशेचं जणु मळाभ साठलेलं. निराश मनाचं प्रतिबिंब चेहर्यावर घेउन फ़िरायचं. चार लोक विचारयचे, अगदि आपलेपणाने "काहिच कसं घडत नाहि तुझ्या जीवनात?, कुठे तरी चुकत असशील मार्ग शोधायला.". पण हे आपले पणाने विचारलेले प्रश्न सुधा बोचयचे. अगदी कुणाला भेटु नाहि असं वाटायचं.
सुन्न झालेल्या मनाबरोबर मग मी चार गोष्टी करायच्या ठरवल्या. अंर्तमनात डोकावायचं ठरवलं. लोकं काहिहि बोलले तरी माझं मन मलाच ओळखायचं होतं. शेवटी माझं आयुष्य मलाच सावरायचं होतं. शांत नदिच्या काठि रम्य वातावरणात मी जाऊन बसले. सुखावणारा वारा मनावरचा ताण कमी करत होता, खळखळ पाण्याचा आवाज मनातले विचार मांडत होता. नीरगाठ सुटावीतशी मग माझ्या मनातील प्रश्नांच्य गाठी सईलसर होत होत्या. सरासर विचार मनाला हलका करत होता. काय हवं आहे आणि काय मिळणार आहे याचीं नीट मांडणी होत होती. ह्यातच मला जाणवलं, की मला बरच काही हवं आहे. आणि ते मला मिळत नाहि म्हणुन मन त्रासतय. त्याच क्षणी मला महारीर बुध्दांचा विचार आठवलां " माणसाच्या दुखाचां खरं कारण म्हणजे त्याने केलेल्या अपेक्षा". मगमाझ्या डोळ्यासमोर मी केलेल्या अपेक्षांचा डोंगर ऊभा राहीला. समाजात मला लोकांनी मान द्यावा हि अपेक्षा, मान मिळवण्यासाठी हवा असलेला पैसा, त्यासाठी वाट्टेल ती नोकरी करयाची तयरी, अगदि स्वाभिमान विकुन काम करण्याची तयारी, त्यात मला समाधान मिळत आहे का नाहि ह्याकडे झालेले दुर्लक्ष, का तर माझ्याकडुन माझ्याच लोकांनी केलेलि अपेक्षा. त्यामुळे अलेली निराशा आणि निराशेपाई घालवलेले माझा जीवन.
देवानं दिलेलं हे सुंदर जीवन मी वाया घलवू पहात होते. पण चार लोकांसारख साचेबध जीवन मला नको आहे. मला माणुस म्हणुन जगायचं आहे. मशीन वजा माणसाला आयुष्याच्या सुंदरतेची आणि निर्मळतेची काय चव. पुढे जायची ईछा माझी पण आहेच, पण म्हणुन माणुसकी आणि आपली माणसं मला मागे टाकायची नाहित, हे मला जाणवलं. फ़ुलपाखरा सारख आयुष्य मला भावतं. जीथे जाइल तिथे रंग़ बहरतं; त्याला जीवनात काहितरी करुन दाखावायची ईर्शा नसेल कदाचित, पण दुस्याना सुख देण्यात ते आपल्या पेक्षा नक्किच यशस्वी आहे. हळु हळु मी विचारातुन बाहेर येत होते, मनावरचा ताण कमी होत होता, मन हलकं वाटत होतं. अगदि फ़ुलासारखं. मी नदिकाठुन ठरवुनच उठ्ले. मला अता जीवन जगायचं नाही, तर ते फ़ुलवायचं आहे. भोवतालच्या फ़ुलांचा सुगंध घेउनच मी निघाले, माझ आयुष्य सुगंधी फ़ुलवण्यासाठी आणि माझ्या माणसांना आनंद देण्यासाठी.
No comments:
Post a Comment