वटवृक्षाच्या सावलीखाली
बरीच माणसं निजायची
सगळ्या चिंता दूर सारून
निश्चिंत पणे सुखायची
वटवृक्षाच्या फांदीवर
अनेक पक्षी बसायचे
रणरणत्या उन्हापासून
लांब रहायला बघायचे
शांत सावलीची शाल पांघरून
सारेच ईथे विसावायचे
पण वटवृक्षाचा विचार मात्र
कधीच कोणी केला नाही
तळपत्या उन्हात सुधा
त्याला मात्र सावली नाही
म्हणूनच की काय कोण जाणे
वळवाचा पाउस यायचा
तेवढाच वटवृक्षाला सुखावून जायचा
शेवटी माणूस का दुसर्याचा विचार करणार
तिथे निसर्गच निसर्गाला तारणार !!
1 comment:
Kya baat hai?
Post a Comment